Monday, November 18, 2024
Homeनगरअपक्ष उमेदवार राहुल जगताप राष्ट्रवादीतून निलंबीत

अपक्ष उमेदवार राहुल जगताप राष्ट्रवादीतून निलंबीत

बंडखोरीमुळे पक्षाने केली कारवाई

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणार्‍या माजी आ. राहुल जगताप यांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षाने निलंबित केले. याबाबतचे पत्र पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी दिले आहे. दरम्यान जगताप यांच्यावर झालेल्या कारवाईने पाचपुते नागवडे समर्थकच आनंदित असल्याचे दिसले.

- Advertisement -

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आ. जगताप प्रयत्न करत होते. पण ऐनवेळी महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीऐवजी ठाकरे गटाला सोडली. यामुळे राहूल जगताप अपक्ष मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचे सांगत जगताप मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत. शरद पवार यांच्या फोटोसह राष्ट्रवादीची यंत्रणाबरोबर घेऊन जगताप प्रचारात उतरले आहेत.

मात्र, आता जगताप यांचा खासदार शरद पवार यांचे बंडखोरीला समर्थन असल्याचा दावा फोल ठरला असल्याचे नागवडे समर्थक यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जगताप यांच्या निलंबन पत्रात महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या अनुराधा नागवडे निवडणूक लढवत असताना आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात, हे पक्षशिस्तीला धरून नसल्याने कारवाई करण्यात येत आहे.

कारवाई त्यांच्यावर आनंद यांना
महाविकास आघाडीमधील राहुल जगताप यांची बंडखोरी थेट विजय पराजय ठरवू शकते. लोकसभेला अडचणीत असताना जगताप यांनीच खा. शरद पवार यांच्या पक्षाला साथ दिली. यामुळे आता थेट जगताप याचे निलंबन झाले असल्याने नागवडे गटाला आनंद झाला आहे. मात्र, जगताप यांचा कोणाला फटका बसणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या