Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election Results 2026 : तामिळनाडूत थलापतीचा 'विजय', केरळमध्ये काँग्रेसची सरशी; पश्चिम...

Assembly Election Results 2026 : तामिळनाडूत थलापतीचा ‘विजय’, केरळमध्ये काँग्रेसची सरशी; पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीत भाजप, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

ममता, स्टॅलिन यांचा दारूण पराभव

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) अंतिम निकाल हाती आले असून, भारतीय राजकारणाची समीकरणे पूर्णतः बदलल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत तृणमूलचा गड उद्ध्वस्त केला आहे, तर तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजयच्या पक्षाने द्रविडी राजकारणाला सुरुंग लावला आहे. केरळमध्ये एलडीएफची सत्ता गेल्यानंतर आत्ता संपूर्ण देशाचे लक्ष या नवीन सत्तासमीकरणांकडे लागले आहे.

- Advertisement -

गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पराभूत करून भाजपने बंगालमध्ये दोन तृतीयांश बहुमतासह सत्ता काबीज केली आहे. अमित शाह यांची पन्ना प्रमुख रणनीती आणि शुभेंदु अधिकारी यांनी जमिनीवर केलेली मेहनत भाजपसाठी (BJP) गेमचेंजर ठरली. ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर आणि नंदीग्राममध्ये शुभेंदु अधिकारी यांनी पराभव केला आहे.

बिहार आणि ओडिशानंतर आता बंगालमध्येही सत्ता मिळवून भाजपने आपले जुने स्वप्न पूर्ण केले. तामिळनाडूच्या ५० वर्षांच्या द्रविडी राजकारणाच्या परंपरेला सुपरस्टार थलापती विजयच्या कळघम तमिलगा वेत्री (टीव्हिके) पक्षाने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्याच कोलाथूर बालेकिल्ल्यात टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी पराभव केला, टीव्हीके १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून बहुमताच्या (११८) जवळ पोहोचला आहे. काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने विजय तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये (Keral) पिनराई विजयन यांचे १० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सत्ताविरोधी लाट आणि यूडीएफच्या मजबूत प्रचारामुळे एलडीएफचे गड ढासळले आहेत. विजयन यांची केंद्रीकृत नेतृत्व शैली मतदारांना न पटल्याने केरळमध्ये सत्तापरिवर्तन झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १०१ हुन अधिक जागा जिंकत सत्तेची हॅटट्रीक साधली आहे. काँग्रेस (Congress) नेते गौरव गोगोई यांचा जोरहाटमध्ये मोठा पराभव झाला आहे. पुद्दुचेरीमध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे.

राज्यांनुसार विधानसभा निकाल

पश्चिम बंगाल

भाजप-२०७
तृणमूल काँग्रेस- ८०
काँग्रेस -०२
डावे पक्ष- ०२
इतर-०२
एकूण जागा-२९३

तामिळनाडू

द्रमुक- ७४
अण्णाद्रमुक-५३
टीव्हीके-१०७
इतर-००
एकूण जागा-२३४

केरळ

काँग्रेस यूडीएफ आघाडी-१०२
डावी आघाडी -३५
इतर-०३
एकूण जागा-१४०

आसाम

भाजप-१०२
काँग्रेस- १९
इतर-०५
एकूण जागा-१२६

पुद्दुचेरी

भाजप – १८
काँग्रेस-०६
इतर-०६
एकूण जागा-३०

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...