नाशिक | Nashik
राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उल्हासाचे वातावरण असले तरी त्याहूनही जास्त उत्साहाचे वातावरण हे सेवा उद्योगांमध्ये दिसून येत आहे. निवडणुका आल्या म्हणजे त्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत असतात. निवडणुका म्हटल्या की, कार्यकर्त्यांचा मोहोळ उभा राहत असतो. उमेदवारांची (Candidate) ओळख, त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध साधनांचा वापर होत असतो. या सर्व गोष्टींसाठी लागणारी इकोसिस्टीम ही अत्यंत गरजेची असते.
हे देखील वाचा : मोठी बातमी! चांदवडमधून राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी
त्यात प्रामुख्याने पॅम्प्लेट छपाई, बॅनर लावणे, होर्डिंग बनवणे, कार्यकर्त्यांना (Worker) बसण्यासाठी मंडप, खुर्च्छा, झेंडे, फ्लेक्स, गळ्यात अडकवायचे पट्टे, बॅच, जेवणावळी, नाश्ता, चहापान यासारख्या एक ना अनेक वेगवेगळ्या कामातून अनेक हातांना रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. त्यामुळे केवळ राजकीय नेतेच निवडणुकांची वाट पाहत नाही तर प्रचारासाठी उपयुक्त सर्वच यंत्रणांची आतुरतेने वाट पहाताना दिसून येत आहे. प्रचाराला लागणारे टेम्पो, चालक, रिक्षा, स्पीकर, भोंगे, मंडप, डेकोरेटर सगळ्यांची गरज उमेदवाराला लागत असते. प्रत्यक्षात तिकीट वाटेपर्यंत मैदानात उतरणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने व्यवसायाच्या (Business) संधी शोधण्यासाठी अनेक एजन्सी काम करू लागलेल्या आहेत.
हे देखील वाचा : Nirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?
उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी काही एजन्सी सर्वेक्षणाचे (Survey) काम करुन देत आहेत. काही लोक मतदानाच्या प्रचाराची ऑनलाईन साहित्य (जसे टेम्प्लेट, पोस्टर्स, मोबाईलवरील अॅप्स निर्धारित भागातील मतदारांच्या मोबाईल क्रमांकासह याद्या पुरवणे, मतदारांचे ओपिनियन पोल तयार करुन देणे अशा विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या एजन्सीज निर्माण झाल्या आहेत. प्रचाराचे तंत्रज्ञान बदलले असले तरी यंत्रणा राबवण्यासाठीच्या एजन्सी वेगाने पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या की सर्वच क्षेत्रांमध्ये व्यवसायाची संधी दिसायला लागली आहे.
हे देखील वाचा : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; ‘या’ नेत्याला मिळाली संधी
बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात चलन वाढण्याची संधी निर्माण झाली आहे. पूर्वी प्रचार यंत्रणाही घरोघरी जाऊन तोंडी प्रचारातून करण्याची पध्दत होती. आता मात्र प्रचार हायटेक झाला आहे त्यातून पेपरलेस होत असताना देखील प्रचाराची साधने बदलल्यामुळे खर्चाचा आवाका देखील प्रचंड वाढला आहे. मात्र या सर्व गदारोळात जय-पराजयचे गणित वेगळे असले तरी लागणाऱ्या यंत्रणांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे.
हे देखील वाचा : Sameer Wankhede : डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून उमेदवारी मिळणार
मनुष्यबळ पुरवणाऱ्या एजन्सीज
प्रचारात काढल्या जाणाऱ्या रॅली, पत्रक वाटपासाठी धावणारे कार्यकर्ते पुरवणारी यंत्रणा उदयाला आलेली आहे. पूर्वी पक्षाचे कार्यकर्ते हे काम करीत होते. आता ‘पेड’ महिलांच्या माध्यमातून हे काम केले जाते. त्यासोबतच सभा, शक्तीप्रदर्शनासाठीच्या महारॅली यासाठी लागणारी गर्दी देखील पेड करुन देणाऱ्या एजन्सीज उदयाला आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी साधने उपलब्ध करुन देणाऱ्या व्यावसायिकांचा बाजार गरम झाला असून येत्या महिनाभर त्यांची चांदी राहणार असल्याचे चित्र आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा