Thursday, October 24, 2024
Homeनगरदुसर्‍या दिवशी 140 जणांनी नेले 236 उमेदवारी अर्ज

दुसर्‍या दिवशी 140 जणांनी नेले 236 उमेदवारी अर्ज

7 जणांचे अर्ज दाखल || दोन दिवसांत 612 अर्जांची विक्री

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या (बुधवार) दिवशी श्रीगोंदा, अकोले, राहुरी, कोपरगाव या चार मतदारसंघांत प्रत्येकी एक तर शेवगाव-पाथर्डीत तीन अशा सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, काल 140 जणांनी 236 उमेदवारी अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी 196 व्यक्तींनी 376 अर्ज नेले होते. दोन दिवसांत 612 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

- Advertisement -

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यात शनिवार व रविवार सुट्टी आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात उमेदवारांसह समर्थकांची मोठी गर्दी होत आहे. दोन दिवसांपासून अर्ज घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र अर्ज दाखल करणार्‍यांची संख्या कमी आहे. आज, गुरूवारी अनेक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. आज काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने नेते व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. यंदा निवडणुकीला कमी दिवस असल्याने आता इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यात काही मतदार संघात पक्षाकडून अद्यापही उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळत नसल्याने धाकधूक वाढली आहे.

नगर शहर, श्रीरामपुरात सर्वाधिक अर्जांची विक्री
बुधवारी अकोले मतदारसंघात 5 व्यक्तींनी 5 अर्ज नेले. कर्जत-जामखेडमध्ये 4 व्यक्तींनी 7 अर्ज, श्रीगोंद्यात 15 व्यक्तींनी 22 अर्ज, कोपरगावमध्ये 14 व्यक्तींनी 22 अर्ज, पारनेरमध्ये 11 व्यक्तींनी 18 अर्ज, श्रीरामपुरात 18 व्यक्तींनी 32 अर्ज, संगमनेरमध्ये 9 व्यक्तींनी 16 अर्ज, शिर्डीत 6 व्यक्तींनी 8 अर्ज, नेवासा 6 व्यक्तींनी 14 अर्ज, शेवगाव-पाथर्डीत 18 व्यक्तींनी 31 अर्ज, राहुरीत 12 व्यक्तींनी 15 अर्ज आणि नगर शहरात 22 व्यक्तींनी 46 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या