Friday, November 1, 2024
Homeनगरराहुरीत दोन, तर कर्जत-जामखेडमध्ये एकाची माघार

राहुरीत दोन, तर कर्जत-जामखेडमध्ये एकाची माघार

4 नोव्हेंबरकडे सर्वांच्या नजरा || दिवाळीमुळे अपक्षांचा भाव वधारला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत 289 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जांची बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. त्यातील फक्त 30 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून 259 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहे. पात्र उमेदवारांची यादी त्या-त्या मतदारसंघात प्रसिध्द करण्यात आली होती. गुरूवारी माघारीच्या पहिल्या दिवशी राहुरी मतदारसंघातून दोघांनी तर कर्जत-जामखेड मतदारसंघात 1 अशा तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे 12 मतदारसंघांत अजून 286 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आता सर्वांच्या नजरा 4 नोव्हेंबरच्या माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज छाननीत बाद झालेल्या अर्जांमध्ये डमी अर्जांचाच अधिक समावेश होता. त्यामध्ये कोणत्याही प्रमुख उमेदवारांचा समावेश नव्हता. बाद झालेल्या अर्जात आवश्यक कागदपत्रे नसलेल्या अर्जाचा समावेश होता. यामुळे दाखल बहुतेक अर्ज वैध असल्याने आता अर्ज माघारीकडे मतदारांचे लक्ष लागले. काही अर्जांबाबत हरकती आल्याने त्यावर सुनावणी झाली. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे, हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य असून अशा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक होतांना दिसत आहे. दुसरीकडे दाखल उमेदवारी अर्ज बाद होऊ नये, म्हणून बहुतेक उमेदवारांनी काळजी घेतली.

जिल्ह्यात अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांना उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून भरलेले आहेत. ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की ऐनवेळी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गुरूवारी माघारीसाठी पहिला दिवस होता. मात्र, पहिल्या दिवशी फारसे विशेष घडले नाही. दिवाळी सण तोंडावर असल्याने माघारी झाल्या नसल्याचे सांगण्यात येत असून अपक्षांना माघारीसाठी शनिवारी आणि रविवारी संपर्क करण्यात येणार असल्याचे राजकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान दिवाळीमुळे अपक्ष उमेदवार भाव खातांना दिसत असून यामुळे शनिवारी आणि रविवारी या अपक्षांच्या मनधनीचा सुपर डे ठरणार आहे. त्यानंतर रविवारी बहुतांशी मतदारसंघात अपक्षासह अपेक्षा पूर्ण होणारे उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे.


वैध उमेदवार : अकोले 13, संगमनेर 16, शिर्डी 15, कोपरगाव 20, श्रीरामपूर 31, नेवासा 24, शेवगाव 36, राहुरी 25 (3), पारनेर 21, अहमदनगर शहर 27, श्रीगोंदा 36, कर्जत-जामखेड 22, एकूण 286 असे आहेत.

कर्जतमधून पवार तर राहुरीत तनपुरे यांची माघार
माघारीच्या पहिल्या दिवशी कर्जमधून रोहित सुरेश पवार (रा. सुपे, बहिरोबावाडी, ता. कर्जत) यांनी माघार घेतली आहे. तर राहुरीतून अरुण बाबूराव तनपुरे (रा. तनुपरे गल्ली, राहुरी) आणि नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे (रा. मांजरी, ता. राहुरी) अशा तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या