Saturday, October 19, 2024
HomeनगरAssembly Elections : पोलिसांची जिल्ह्याच्या सीमेवर 12 ठिकाणी नाकाबंदी

Assembly Elections : पोलिसांची जिल्ह्याच्या सीमेवर 12 ठिकाणी नाकाबंदी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले असून जिल्ह्याच्या सीमा असलेल्या भागात 12 ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य, शस्त्रे यांचा जिल्ह्यात पुरवठा होण्याची शक्यता गृहीत धरून संशयित वाहनांची 24 तास तपासणी केली जात आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत सदरचे चेकपोस्ट सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहेत. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्निशस्त्रे यांवर विशेष लक्ष असणार आहे. पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी, गस्त घालून व विशेष मोहिम राबवून जास्तीत जास्त करवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

दरम्यान बाहेरच्या जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य, अग्निशस्त्रे येण्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्याच्या सीमा असलेल्या भागात 12 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चेकपोस्टच्या ठिकाणी राहुटी लावण्यात आली असून त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व तीन अंमलदार यांना ड्यूटी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून रात्रंदिवस तपासणी करण्यात येत आहे.

वायरलेस संदेश यंत्रणा ही बसवण्यात आलेली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी स्वत: पोलीस अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व पोलीस उपअधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भेटी देत आहे. नाकाबंदी दरम्यान अवैध मद्य, अंमली पदार्थ, रोकड किंवा शस्त्रे मिळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नाकाबंदी करण्यात आलेले ठिकाण व कंसात पोलीस ठाणे

कर्‍हेटाकळी (शेवगाव), मिडसांगवी (पाथर्डी), साकत नाका (जामखेड), खेड (कर्जत), सुपा टोलनाका (सुपा), टाकळी ढोकेश्‍वर (पारनेर), काष्टी (श्रीगोंदा), नाऊर (श्रीरामपूर तालुका), कर्‍हे घाट (संगमनेर तालुका), आळे खिंड (घारगाव), येसगाव फाटा (कोपरगाव तालुका) व प्रवरासंगम (नेवासा).

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या