Sunday, October 20, 2024
Homeनगरनिवडणूक आयोगाकडून चहापासुन ते जेवणापर्यंत दर निश्चित; व्हेज-नॉजव्हेज थाळीचे वाचा दर

निवडणूक आयोगाकडून चहापासुन ते जेवणापर्यंत दर निश्चित; व्हेज-नॉजव्हेज थाळीचे वाचा दर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने जेवणाची थाळी, चहा, पाणी यांचे दर निश्चित केले आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाई होऊ शकते. दरम्यान, व्हेज थाळी 180, नॉनव्हेज थाळी 240 रूपये, पोहे 20, चहा 10, तर पाणी बाटलीचा दर 17 रूपये ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. येत्या मंगळवारपासून (22 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदान होईपर्यंतचा खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. उमेदवाराने केलेला खर्च आणि सादर केलेले खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाते. यंदा निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला 40 लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 28 लाखांची होती. यंदा यामध्ये 12 लाखांची वाढ करण्यात आली आहे. बैठका, रॅली, सभा आणि जाहिराती, पोस्टर्स, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे.

उमेदवाराला प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी चहापान, जेवण, सभा, प्रचारासाठी वाहन, रॅली, जाहिरात आदी बाबींवर खर्च करावा लागतो. हा खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागतो. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवाराला राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडू शकतो. उमेदवारी अर्ज भरताना खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्या रजिस्टरमध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च, दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य असते.

खर्चांचा तपशील
खर्चांचा प्रकार व दर : व्हेज थाळी स्पेशल 180, नॉनव्हेज थाळी 240, बिर्याणी 150, पोहे 20, चहा 10, कॉफी 15, वडापाव 15, भजे प्लेट 20, पाणी बाटली 17, मिसळपाव 60, पाव भाजी 60, फुलांचा मोठा हार 80, गांधी टोपी 10, फेटा 190, ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती) 500

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या