नाशिक | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने शहर पोलीस आयुक्तालयाने सर्व अधिकारी व कर्मचा-यांना निवडणूक प्रक्रिया, बंदोचस्त व कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वीस विषयांची निवड करून ई-शिक्षणद्वारे पोलिसांना मार्गदर्शन केले जात आहे. सलग चार दिवस डॉ. भीष्मराज बाम सभागृहात हे प्रशिक्षण सत्र सुरू राहणार आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रशिक्षण सत्रांचे नियोजन केले आहे. त्यानुसार नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक तुषार अढावू, सरकारवाडाचे निरीक्षक समाधान चव्हाण, नाशिकरोडचे निरीक्षक बडेसाब नाईकवाडे हे तिघे अधिकारी-कर्मचान्यांना प्रशिक्षित करत आहेत. त्यामध्ये सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, वाहतूक, अभियोग कक्ष, तांत्रिक विश्लेषण, मुख्यालय, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, अंगुलीमुद्रा, मोटार परिवहन, नियंत्रण कक्ष यासह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचा-यांचा
सहभाग आहे.
प्रत्येक सत्रात सुमारे २५० अधिकारी-कर्मचारी सहभागी होत असून पुढील चार दिवसांत तीन हजार पोलिसांना प्रशिक्षित केले जाईल. त्यामध्ये केंद्रीय निवडणूक व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना, आचारसंहिता कालावधीतील कार्यवाही, नियम, बंदोबस्त व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचा-यांना जबाबदारी बाटप करून निवडणुकीच्या दृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा