Friday, November 22, 2024
Homeनगरगुरूवारपासून घरबसल्या मतदान; जिल्ह्यात 2 हजार 688 गृह मतदार

गुरूवारपासून घरबसल्या मतदान; जिल्ह्यात 2 हजार 688 गृह मतदार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वृध्द, दिव्यांग व्यक्तींनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या घरी जाऊन, घरबसल्या मतदान पध्दत अहमदनगर शहर मतदारसंघात (143 मतदार) शनिवार आणि रविवारी राबण्यात आली. उर्वरित जिल्ह्यातील 11 मतदारसंघांत गुरूवार 14 तारखेपासून 16 नोव्हेंबर तीन दिवस गृह मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार 688 जणांनी घरबसल्या मतदान करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या गृह मतदानासाठी 195 रुट प्लन करण्यात आली असून त्यासाठी 137 पथके तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने 85 वर्षाहून अधिक तसेच दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र त्यासाठी संबंधित मतदाराने तशी लेखी पूर्व इच्छा व्यक्त करायला हवी. जिल्ह्यात 80 ते 90 वयाचे 92 हजार 671, 90 ते 100 वयोगटातील 19 हजार 772 तर 110 पर्यंत वय असलेले 1 हजार 663, तसेच 110 वयाचे 1 तर 120 वयापर्यंतचे 1 वृध्द व्यक्ती आहेत. त्यांच्यासह दिव्यांगांना ही सुविधा देण्यात आली आहे. यातील जिल्ह्यातील 2 हजार 688 जणांनी घरबसल्या मतदान करण्यास पसंती दिली आहे. गृह मतदानसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने 137 पथके तयार केली आहेत.

या पथकामध्ये 2 मतदान अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, पोलीस, व्हिडिओग्राफर, मदतनीस यांचा समावेश आहे. ही पथके कोणत्या मार्गाने मतदारांच्या घरी जाणार यासाठी 195 मार्गिका ठरवून देण्यात आल्या आहेत. या मार्गिकेवरून मतपत्रिका घेऊन धावणार्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे मार्गिका सोडून जाणार्‍या वाहनांना प्रतिबंध बसणार आहे. उमेदवार व त्याच्या प्रतिनिधीला मतदानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पथक कोणत्या वेळेला मतदाराच्या घरी पोहोचेल, याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आगाऊ कळवण्यात आले आहे.त्यावेळी पथक मतदाराच्या घरी मतदान कक्ष निर्माण करून मतदान करून घेईल. यासाठी मतपत्रिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी स्ट्रॉग रूममध्ये जमा करणार आहेत.

असे आहे गृहमतदार
अकोले 255, संगमनेर 252, शिर्डी 198, कोपरगाव 218, श्रीरामपूर 131, नेवासा 194, शेवगाव-पाथर्डी 235, राहुरी 144, पारनेर 238, अहमदनगर 143, श्रीगोंदा 312, कर्जत- जामखेड 368 एकूण 2 हजार 688 असे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या