Tuesday, March 25, 2025
Homeनगरलढणार की थांबणार ? कोल्हे समर्थकांमध्ये संभ्रम

लढणार की थांबणार ? कोल्हे समर्थकांमध्ये संभ्रम

कोल्हेंना मंत्रिपदाची ऑफर || फडणवीस साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून 29 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याला काही दिवसच उरले असताना संभाव्य उमेदवार विवेक कोल्हे यांच्या गटात शांतता आहे. कोल्हे लढणार की थांबणार, याबाबत मतदार संघात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. कोल्हे कुटुंबाकडून पुढील निर्णयाची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

- Advertisement -

भाजप पक्षश्रेष्ठींकडून कोल्हेंनी निवडणुकीत उतरू नये यासाठी मनधरणी सुरू आहे. कोल्हे यांना राज्यात मंत्रिपद अथवा राज्यसभेवर वर्णी अशी ऑफर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची चर्चा असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रत्यक्ष अथवा दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हे समर्थकांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ.आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी, भाजप महायुती असल्यामुळे कोल्हेंची निवडणूक लढण्यास अडचण निर्माण झाली आहे. कोल्हेंनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांनी निवडणूक न लढविता भाजपबरोबर राहावे, असे प्रयत्न राज्यातील तसेच केंद्रातील भाजपाचे नेते करीत आहेत. उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांना राज्यसभेचा प्रस्तावही देण्यात आला. मात्र कोल्हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विवेक कोल्हे यांना दिल्लीत बोलावून घेत चर्चा केली. शहा यांनी कोल्हे यांना राज्यात मंत्रीपद किंवा राज्यसभेवर घेण्याचा शब्द दिल्याची चर्चा कोल्हे समर्थकांमध्ये आहे. मात्र मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी समर्थक आग्रही आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घेऊ, असा शब्द त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हे सर्मथक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी चर्चा कोपरगाव मतदारसंघात सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...