Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Session 2024 : विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, कारण काय?

Assembly Session 2024 : विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, कारण काय?

मुंबई । Mumbai

राज्य विधिमंडळाच्या तीस दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आहे. मात्र, विरोधी पक्षांतील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे.

विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ते सभागृहातून बाहेर पडले. ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाहीत. विरोधक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्र्यामध्ये दिसत आहे.

आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड याच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आज शपथ घेणार नसल्याचे सांगितले.

विरोधी पक्षातील आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहाचा त्याग केला. आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा होत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी आज शपथ न घेण्याचे ठरवले आहे.

हे सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले. या विरोधी पक्षातील आमदारांची विधानभवनात बैठक होत आहे. यै बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मत आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...