Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रपरळीमध्ये हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण… Video...

परळीमध्ये हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण… Video व्हायरल

परळी । Parali

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरु आहे. पण काही ठिकाणी राडा झाल्याचं समोर आलेय. परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.

- Advertisement -

परळी मतदारसंघात मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. कारण माराहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती.यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...