Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस उपनिरीक्षक महिलेवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा सहायक पोलीस निरीक्षकाचा प्रयत्न

पोलीस उपनिरीक्षक महिलेवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा सहायक पोलीस निरीक्षकाचा प्रयत्न

पुणे(प्रतिनिधी)

पुण्यातील एका सहायक पोलीस निरीक्षकाने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून विवाहबाह्य संबंध ठेऊन एका पोलीस उपनिरीक्षक महिलेवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या सहायक पोलीस निरीक्षकावर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हरीष सुभाष ठाकूर (वय 40, रा. रेनबो सोसायटी, खडकी, पुणे) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ठाकूर हा सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे. हा प्रकार 2013 पासून आतापर्यंत कळंबोली, नवी मुंबई तसेच आरोपीच्या खडकीतील घरी झाला आहे. याप्रकरणी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, अशी खोटी माहिती दिली व फिर्यादीसोबत विवाह केला. लग्नानंतर आजपर्यंत आरोपीने सतत शारिरीक व मानसिक छळ केला. विवाहबाह्य संबंध ठेवून फिर्यादीसोबत वारंवार अनैसर्गिक संभोग केला. आरोपीने त्यांच्या 5 वर्षाच्या मुलासमोरही फिर्यादीशी अनैसर्गिक संभोग केला.

नवी मुंबई येथील राहत्या घरी 2015 मध्ये आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ती फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला लागून त्यात फिर्यादी जखमी झाल्या होत्या. आरोपीच्या दबावामुळे त्यांनी आजवर तक्रार केली नव्हती.तसेच लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ करुन विश्वासघात केल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खडकी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या