Monday, June 17, 2024
Homeनगरअस्तगावला घंटानाद आंदोलन

अस्तगावला घंटानाद आंदोलन

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडावीत , भाविकांनी ती खुलावी करावी, यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने अस्तगाव येथे घंटानाद करण्यात आला.

अस्तगाव येथील मारुती मंदिरा समोर हे घंटानाद करण्यात आले. तसेच भजनही करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, राजेंद्र महाराज तांबे, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, अशोकराव नळे,

दादासाहेब मेचे, बाजार समितीचे उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, निवास त्रिभुवन, गणेशचे संचालक विजय गोर्डे, सुनील त्रिभान, दादासाहेब गवांदे, राजेंद्र जेजूरकर, अण्णासाहेब गवांदे, भागुनाथ जेजूरकर, सखाराम अष्टेकर,

मच्छिंद्र जेजूरकर, परसराम जेजूरकर, चांगदेव तांबे, सोपान सापते, देवराम अंभोरे, विश्वनाथ जेजूरकर, विश्वनाथ त्रिभान, सखाराम अष्टेकर, भीमराज त्रिभान आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बाभळेश्वर येथे घंटानाद

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडावीत, भाविकांनी ती खुली करावी, यासाठी ग्रामस्थ तसेच भजनीमंडळ, भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने बाभळेश्वर येथे घंटानाद करण्यात आला.

बाभळेश्वर येथील मारुती मंदिरा समोर हा घंटानाद करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, नवनाथ महाराज म्हस्के, राहाता पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबासाहेब म्हस्के, विखे पाटील कारखान्याचे संचालक साहेबराव म्हस्के, भगवान महाराज डमाळे, गंगागिरी महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, लहानु भांड, वसंतराव बेंद्रे, भजनीमंडळ यांनी नियमांचे पालन करून हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जळगावमध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन

चितळी |वार्ताहर| Chitali

राहाता तालुक्यातील जळगाव येथे राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राज्यात करोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.मंदिरे पाच महिन्यांपासून बंद असल्याने त्यावर अवलंबून लाखो लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तसेच राज्यातील लॉकडाउन हळूहळू शिथील होत असताना राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी भाविकांनी केली आहे. राज्य शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा यासाठी भाजप, भाजप आध्यात्मिक आघाडीच्यावतीने काल दि. 29 रोजी राज्यभर दार उघड उध्दवा दार उघड म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जळगाव येथे भाजप तसेच भाविकांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले .यावेळी गंगाधर भिवाजी चौधरी, संपतराव चौधरी, बाळासाहेब चौधरी, चंद्रभान चौधरी, एकनाथ निर्मळ, दत्तात्रय चौधरी, भागवत चौधरी, वेणुनाथ शिणगारे, सुरेश राशिनकर, पोपटराव चौधरी, अण्णासाहेब चौधरी, चांगदेव वाणी, किसनराव कदम, रंगनाथ चौधरी, आप्पासाहेब चौधरी, विजय चौधरी, आण्णासाहेब चौधरी, महेंद्र चौधरी, रवींद्र चौधरी, शैलेश चौधरी, योगेश पंडित, गणेश कापरे आदींसह कार्यकर्ते, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणतांब्यातील मंदिरे उघडण्याची मागणी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील महान योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधी मंदिरासह मंदिर परिसरातील सर्वच मंदिरे तातडीने उघडावीत, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे.

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे धार्मिक विधीसाठी तसेच योगीराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

त्यामुळे भाविकांचा ओघ कमी झाला आहे. त्याचा परिणाम पुणतांब्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे व मंदिरे उघडण्यासाठी काल भाजपाच्यावतीने राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुणतांब्यात असे आंदोलन झाले नसले तरी पुणतांब्यातील मंदिरे लवकरात लवकर भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी भाविकांमधून जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या