Wednesday, September 11, 2024
Homeनगरअस्तगावला मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर

अस्तगावला मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यातील अस्तगाव (Astgav) येथील पिंप्री निर्मळ रोड (Pimpari Nirmal Road) लगत असलेल्या जेजुरकर गाडेकर वस्तीजवळ एक शेतात एक मादी बिबट्यासह (Leopard) तीच्या दोन बछड्यांचा वावर आहे. या बिबट्याने (Leopard) एक कुत्र्यासह (Dog) एक बदक (Duck) फस्त केला आहे.

- Advertisement -

येथील साईराज नर्सरीचे संचालक राजेश जेजुरकर यांच्या शेतात या मादी बिबट्याचे (Leopard) व त्याच्या दोन बछड्यांचे वास्तव्य आहे. येथील तरुणांना या बिबट्याचे (Leopard) दर्शनही झाले. आपले बछडे उसात, घासाच्या शेतात सोडून मादी बिबट्या (Leopard) आजुबाजुच्या वस्त्यावर आपले भक्ष शोधत असल्याने जेजुरकर वस्ती भागात रहिवश्यांमध्ये घबराट पसरली आहे.

मुळा ‘एवढे’ टक्के भरले

दोन दिवसांपुर्वी या वस्तीवरील बाळासाहेब शिरसाठ यांचे एक कुत्रे (Dog) या बिबट्याने ठार केले. तर बिरोबा मंदिराच्या मागील त्रिभुवन वस्तीवरील बदक (Duck) फस्त केला. आपले भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या (Leopard) फिरत असल्याने लहान मुले, शाळकरी मुले यांच्या मध्ये भितीचे वातावरण आहे.

वनविभागाने (Forest Department) या बिबट्यांना पिंजरा (Cage) लावुन जेरबंद करावे, अशी मागणी माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे व राजेश जेजुरकर यांनी केली आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिजरा (Cage) लावावा. अन्यथा या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कायम राहिल, असेही श्री. गव्हाणे यांनी सांगितले.

भंडारदरातील विसर्ग 6087 क्युसेकगोदावरीत 7190 क्युसेकने विसर्ग

- Advertisment -

ताज्या बातम्या