Sunday, May 26, 2024
Homeजळगावरावेर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रस्तारोको

रावेर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रस्तारोको

रावेर|प्रतिनिधी raver

जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्च्यातील कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा रावेरात सकल  मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत निषेध करण्यात आला.आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको करण्यात आला.यावेळी श्रीराम गृपचे चेअरमन उद्योजक श्रीराम पाटील,रावेर पीपल्स बँकेचे संचालक सोपान पाटील,बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील,गणेश महाजन,मॅॅक्रो व्हिजन स्कूलचे सचिव स्वप्नील पाटील.मराठा समाज मंडळाचे सचिव वामनराव पाटील,सहसचिव दिलीप पाटील, डॉ.एस.आर.पाटील,भीमराव पाटील,भगवान गायकवाड,संतोष पाटील,माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, अजबराव पाटील, प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी (पातोंडी), सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या असल्याने पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी आंदोलकांना रस्त्यावरून उठवून बाजूला केले.यानंतर आंदोलकांनी तहसीलदार बी.ए.कापसे यांना निवेदन सादर करून घटनेचा तीव्र निषेध केला आहे.गृहमंत्री यांनी अमानुष मारहाणी प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील घटनेचा निषेध  

आंदोलक यांनी रस्ता रोको करून पोलीस स्टेशन गाठले यावेळी मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील देखील रावेर पोलीस स्टेशनला दाखल झाले.त्यांनी उद्योजक श्रीराम पाटील व आंदोलक प्रशांत पाटील व सहकारी यांच्यासोबत चर्चा करून आंदोलनाला पाठींबा दिला.त्यांनी अमानुष मारहाणी प्रकरणीचा निषेध केला.या घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.दरम्यान आंदोलकांनी आंदोलनानंतर पोलीस स्टेशनला चहापान घेतल्याबद्दल  सामान्य कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या