Tuesday, September 17, 2024
Homeनगरडॉ. आठरेसह बालगृहाच्या अधीक्षकांविरूध्द गुन्हा

डॉ. आठरेसह बालगृहाच्या अधीक्षकांविरूध्द गुन्हा

हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून बालकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहाच्या (MIDC Athare Patil Balghruh) आवारात उघड्या व जीर्ण झालेल्या वीजेच्या तारेचा शॉक (Electric Shock) लागूनच आठ वर्षीय बालक साईराज गणेश बावरे याचा 20 मे रोजी सकाळी मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, बालगृहाचे अधीक्षक पुष्पाजंली बाळासाहेब थोरात (रा. रेणुकामाता मंदिरासमोर एमआयडीसी) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साईराजची आई भक्ती गणेश बावरे (वय 28 रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांनी 22 मे रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे.

साईराज हा चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचलित शैक्षणीक बालगृह, रेणुकामाता मंदिरासमोर एमआयडीसी येथे राहत होता. तो 20 मे रोजी सकाळी बालगृहातील आवारात खेळत असताना नऊ वाजेच्या सुमारास त्याला आवारातील उघड्या व जीर्ण झालेल्या वीजेच्या तारेचा शॉक (Electric Shock) लागला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या घटनेनंतर मयत साईराजचे नातेवाईक संतप्त झाले होते. बालगृहाच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची मागणी त्यांनी केली होती.

पोलिसांनी चौकशी केली असता ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आठरे, बालगृहाचे अधीक्षक थोरात यांच्या निष्काळजीपणे व हयगयीने बालगृहातील इमारतीच्या वीजेच्या तारेचे देखभाल न ठेवता सदर इमारतीच्या बाहेरील बाजुस वीजेची जीर्ण झालेली तार निष्काळजीपणे उघडी व चालू अवस्थेत ठेवली. त्या तारेला साईराजचा हात लागून त्याला शॉक बसला व त्यात त्याचा मृत्यू (Death) झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार परदेशी अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या