सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. कतरिना कैफ- विकी कौशल नंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विवाहबंधनात अडकले.
आता त्यांच्या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत आहे.
- Advertisement -
अथिया आणि केएल राहुल पुढील तीन महिन्यांमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईमध्ये हा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीने पार पडणार आहे.
दरम्यान आथिया नुकतीच जर्मनीहून परतलीय. राहुल त्याच्या सर्जरीसाठी जर्मनीत गेला होता. या सर्जरीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्धची सीरिज खेळू शकला नाही.
तसंच आगामी आशिया कप स्पर्धेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी राहुल फिट होणं आवश्यक आहे.