Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमएटीएमची अदलाबदल करून पैसे काढणारा भामटा गजाआड

एटीएमची अदलाबदल करून पैसे काढणारा भामटा गजाआड

राहाता |वार्ताहर| Rahata

हात चलाखी करून एटीएम कार्डची (ATM Card) अदलाबदल करणारा मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील तरूणास राहाता पोलिसांनी (Rahata Police) मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील असलेले विविध बँकेचे एकूण 70 एटीएम हस्तगत केले आहे. दीपक राजेंद्र सोनी (वय 35 रा. वॉर्ड नंबर 11, गोवर्धन टाकी जवळ, छत्रपूर, मध्यप्रदेश) असे या भामट्याचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, राहाता येथील भारतीय स्टेट बँकेसमोर (Sate Bank Of India) असलेल्या एटीएम मशीन जवळ रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक अनोळखी इसम एटीएम (ATM) जवळ चक्कर मारत असल्याचा फोन राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे पथकासह स्टेट बँकेच्या एटीएमकडे धाव घेत त्या ठिकाणी एटीएमच्या बाहेर फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे एकूण 70 एटीएम व दोन फेविक्विक ट्यूब सापडले.

काही महिन्यापूर्वी नांदुर्खी (Nandurkhi) येथील एका व्यक्तीचे या भामट्याने एटीएमची अदलाबदल करत पैसे काढले होते. पोलीसांनी योग्यवेळी या भामट्याला पकडल्यामुळे पोलीसांचे नागरिकांमधुन कौतुक केले जात आहे. हा भामटा एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्याच्या जागेवर फेविक्विक लावून ठेवायचा. त्यामुळे एटीएममध्ये पैसे (Money) काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने एटीएममध्ये कार्ड टाकले तर ते चिटकून बसायचे. या ठिकाणी उपस्थित असलेला भामटा या संधीचा फायदा घेत तात्काळ हात चलाखी करत एटीएम कार्डची आदलाबदल करत पैसे काढायचा. या घटनेनंतर पोलीस उपधीक्षक शिरीष वमने यांनी राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) भेट देऊन या भामट्याची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. या भामट्याला न्यायालयात हजर केले असता राहाता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...