Saturday, July 27, 2024
Homeजळगावजळगाव : शिव कॉलनाजवळील एटीएम फोडले

जळगाव : शिव कॉलनाजवळील एटीएम फोडले

जळगाव – jalgaon

शिवकॉलनीमधील रेल्वे उड्डाण पुलाच्या परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेजवळील एटीएम चोरट्यांनी रविवारी पहाटे १.५५ ते २.३८ वाजेदरम्यान गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. चोरट्यांनी अवघ्या ४३ मिनिटीत १४ लाख ४१ हजारांची रक्कम लंपास केली आहे. तर एटीएम कक्षातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण कैद झाले आहेत.

- Advertisement -

ही घटना एटीएमच्या परिसरातील योगेश शिवाजी जाधव यांच्या सकाळी ८.३० वाजता लक्षात आली. एटीएम फोडल्यानंतर चोरट्यांनी त्या ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडू दिले होते. या ठिकाणी एटीएमसह डिपॉझिट मशीनही असून ते सुरक्षित आहे. या घटनेबाबत जाधव यांनी तत्काळ बँकेचे शाखा व्यवस्थापक दिवेश अर्जुन चौधरी यांना कळविले. त्यानंतर चौधरी यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी आढळले माचीस, लायटर

पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला असता त्या ठिकाणी फोडलेल्या एटीएमचे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. तर त्या ठिकाणी पोलिसांना ‘बबिता’ माचीस व लायटर आढळले. ही माचीस व लायटर चोरट्यांनी गॅस कटरसाठी वापरले असावे. ही माचीस हरियाणामधील असल्याने चोरट्यांची टोळी देखील हरियाणामधील असावी, असा अंदाज आहे.

या घटनेबाबत कळताच अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.ए.पटेल यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.

अलार्म बंद, वॉचमन नाही

या एटीएमच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी वॉचमन आणि अलार्मची सिस्टिम्स सुद्धा नाही. अलार्म असता तर ही घटना टळू शकली असती. दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्याच हद्दीत कुंभारनगर परिसरातील एका एएटीएमचा अलार्म वाजून त्याबाबतचा धोक्याचा इशारा पोलिसांना मिळाला होता. त्यामुळे पोलीस त्या एटीएमजवळ तातडीने पोहचले. परंतु, त्या ठिकाणी पोलिसांना चोरी, अथवा गैरप्रकार आढळला नव्हता.

शहरातील अनेक एटीएमजवळ दिवसाच नव्हे, तर रात्री सुद्धा वॉचमन नसतात. संबंधित बँकांचे व्यवस्थापन या एटीएमच्या सुरक्षेसाठी काहीही दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे चोरट्यांना फावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या