Saturday, October 17, 2026
Homeक्राईमPathardi : अत्याचार प्रकरणातील संशयिताच्या पलायनाने खळबळ

Pathardi : अत्याचार प्रकरणातील संशयिताच्या पलायनाने खळबळ

पोलीस कर्मचार्‍यावर मदतीचा आरोप || सीसीटीव्ही तपासाची मागणी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील अत्याचार प्रकरणातील संशयित गणेश बाळासाहेब म्हस्के याला पाथर्डी पोलीस ठाण्यातून पळून जाण्यास पोलीस कर्मचार्‍याने मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दि. 16 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान गणेश म्हस्के याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत बसविण्यात आले होते. संबंधित कर्मचारी वारंवार त्या खोलीत ये-जा करत असल्याचे सांगितले जात असून, तैनात होमगार्ड काही वेळासाठी तेथून गेल्यानंतर संशयित पसार झाल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून, फुटेज तपासून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. घटनेनंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संबंधित कर्मचार्‍याला संशयिताला तातडीने हजर करण्याचे आदेश दिल्याचे समजते. गुन्हा दाखल केल्याबद्दल नागरिकांनी आनंद कोकरे यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, संबंधित कर्मचार्‍याने आरोपीची बाजू घेत फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. संशयित आरोपीचे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध व संबंधित कर्मचार्‍याशी जवळीक असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; ‘मकोका’ अंतर्गत धडक कारवाई

0
पुणे | प्रतिनिधी शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या...