Monday, October 19, 2026
Homeक्राईमShrirampur : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना तात्काळ अटक

Shrirampur : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना तात्काळ अटक

जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी कटरने हल्ला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर लोखंडी कटरने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ अटक केली. आकाश भाऊसाहेब त्रिभुवन, सागर भाऊसाहेब त्रिभुवन आणि भाऊसाहेब यादव त्रिभुवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 10 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 ते 10.45 वाजण्याच्या सुमारास गोंधवणी, वॉर्ड क्रमांक 1, श्रीरामपूर येथील पाण्याच्या टाकीजवळ संकेत भाऊसाहेब वाघमारे हा एकटा असल्याचे पाहून आरोपी आकाश त्रिभुवन याने त्याच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

यावेळी सागर भाऊसाहेब त्रिभुवन आणि भाऊसाहेब यादव त्रिभुवन यांनी संकेत वाघमारे याला पकडून धरले. त्यानंतर आकाश त्रिभुवन याने हातातील लोखंडी कटरने संकेतच्या गळ्यावर, दंडावर व हातावर वार करून त्याला जखमी केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद आहे. या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 892/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 3(5), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांनी तपास पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींबाबत माहिती मिळवून त्यांचा शोध घेण्यात आला.

या तपासादरम्यान आकाश भाऊसाहेब त्रिभुवन, सागर भाऊसाहेब त्रिभुवन आणि भाऊसाहेब यादव त्रिभुवन (तिघेही रा. गोंधवणी, वॉर्ड क्र. 1, श्रीरामपूर) हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना नमूद गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, आप्पासाहेब हंडाळ, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन दुकळे, रविंद्र शिंदे, रोहित डोंगरे आणि नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करीत आहेत.

ताज्या बातम्या

Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील संशयितांची नावे समोर;...

0
मुंबई | Mumbai बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर जुहू येथे झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणात (Firing Case) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मोठे यश आले...