Sunday, May 18, 2025
Homeधुळेधुळ्यात ब्राह्मण कुटूंबावर हल्ला, पाच जणांवर गुन्हा

धुळ्यात ब्राह्मण कुटूंबावर हल्ला, पाच जणांवर गुन्हा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील मनमाड जीन (Manmad gene) परीसरात ब्राम्हण कुटूंबावर (Brahmin family) हल्ला (Attacked) केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. भाविकांना (devotees) अभिषेक (Abhishek) केलेले रुद्राक्ष विक्री (Rudraksh sale) न करता फुकटात वाटप (Free distribution) केल्याच्या रागातून (out of anger) हा प्रकार घडला. याप्रकरणी आझादनगर पोलिसात (Azadnagar Police) पाच जणांवर गुन्हा (Crime against five persons) नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सौ.कल्पना अरविंद कुलकर्णी (रा. दत्त मंदिरासमोर, मनमाड जीन, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचे पती अरविंद राजाराम कुलकर्णी व मुलगा मयुर हे घराजवळील श्री.दत्त मंदिराची देखभाल व पुजा-अर्चा करण्याचे तसेच ज्योतीष शास्त्राचे काम करतात. त्यांचे पती अरविंद कुलकर्णी यांनी श्रावण मासात नेपाळ येथून रुद्राक्षाची पिंड मागविली होती. ही पिंड दत्त मंदिरात ठेवली होती. या पिंडवर शास्त्रयुक्त पध्दतीने अभिषेक करण्यात आला होता.

त्यानंतर पिंडवर असलेले रुद्राक्ष हे भाविकांना फुकटात वाटप करण्यात आले होते. त्याचा शुभम रनमाळे, स्वप्नील बाबा, मयुर सोनवणे यांना राग आला. अभिषेक केलेले रुद्राक्ष भाविकांकडून पैसे घेवून वाटप करायला हवे होते., असे त्यांचे म्हणणे होते. मात्र कल्पना कुळकर्णी यांच्या पतीने तसे केले नाही. त्यामुळे वरील संशयीतांनी त्यांच्याशी वाद घालून कुटुंबियांना शिवीगाळ करीत होते.

दि.15 रोजी रात्री मयुर याचे मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने संपर्क करून जातीवाचक शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यानंतर दरम्यान शुभम रनमाळे, स्वप्नील बाबा, मयुर सोनवणे, आण्णा चौधरी, तेजस सोनार यांनी घरासमोर येवून कल्पना कुळकर्णी यांच्यासह कुटूंबियांना शिवीगाळ केली. तसेच घरासमोर लावलेल्या त्यांच्या दुचाकीस लाथ व दगड मारून नुकसान केले. त्यानंतर घरावर दगडफेक करुन हल्ला केला.

घरात घुसून जातीवाचक बोलून अरविंद कुळकर्णी यांना ढकलून दिले. तर कल्पना कुळकर्णी यांना मारहाण केली. यावेळी संशयीतांनी घरातील प्लॅस्टीक खुर्ची व लहान मुलांच्या सायकलचीही तोडफोड केली. त्यानंतर तुमचा खून करू, अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यावरून पाचही संशयीतांवर गुन्हा दाखल झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : मोक्कान्वये सात वर्षांचा कारावास; एटीएम फोडून दरोडा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूर हद्दीतील (Satpur Area) आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) एटीएम फोडून दरोडा घालणाऱ्या टोळीविरोधात मोक्काअन्वये (Mocca) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील...