Tuesday, November 26, 2024
Homeधुळेएलसीबीच्या पथकावर हल्ला ; पाच पोलिस जखमी

एलसीबीच्या पथकावर हल्ला ; पाच पोलिस जखमी

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील वरखेडे गाव शिवारात झन्ना-मन्ना खेळणार्‍यांवर एलसीबीच्या पथकाने काल रात्री छापा टाकला. त्याचा राग येवून जमावाने पोलिस पथकावरच हल्ला चढविला. हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याप्रकरणी 23 जणांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी रात्रीच धरपकड करीत 19 जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वरखेडे गावात दि. 20 पासून बहीरम महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेपुर्वीच काल बहिरम महाराज मंदीर परिसरामागील बाजुस असलेल्या एका घराच्या मागे काही जणांनी अवैधपणे 52 पत्त्याच्या कॅटवर झन्ना-मन्ना नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ सुरू केला. याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला. तेव्हा कारवाई करू नये म्हणून जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिस पथकावर हल्ला चढविला. पोकाँ योगेश विजय ठाकुर, मयुर पाटील, तुषारी पारधी, जगदिश सुर्यवंशी व योगेश साळवे यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात पाचही जण जखमी झाले.

याबाबत पोकाँ योगेश ठाकुर यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून विलास राजेंद्र मराठे, लक्ष्मण लोटन पाटील, सुधीर दिगंबर धनगर, विपुल राजेंद्र पाटील, राकेश लोटन पवार, नितीन उर्फ सोनु शिवाजी पवार, जयेश अनिल पाटील, नंदु युवराज पाटील, अविनाश शंकर घुमटकर, सागर अरूण पाटील, कैलास प्रदीप पाटील, दिलीप लोटन शिंदे, मयुर अरूण भदाणे, राकेश कैलास पाटील, सागर एकनाथ पाटील, पंडीत सुखदेव पाटील, मच्छिंद नवनीत मराठे, वाल्मीक भिमराव पाटील, अमोल उर्फ गोपाल निवृत्ती चव्हाण, संदीप उर्फ पप्पु राजेंद्र पाटील, रोहीत उर्फ मोन्या सत्यजीत पटेल, विक्की बाबु घुमटकर, 23, शिवाजी यशवंत माळी व इतर सर्व (रा. वरखेडेगांव ता.धुळे) यांच्याविरोधात भांदवि कलम भांदवि कलम 353, 332, 148, 147, 149, 427 सह मजुका अ‍ॅक्ट कलम-12 (अ) प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय अनिल महाजन करीत आहेत. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच संशयीत आरोपींची धरपकड सुरू केली. एकुण 19 जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या