Wednesday, March 26, 2025
Homeधुळेचोरटे सापडले नाही म्हणून पोलिसावर हल्ला

चोरटे सापडले नाही म्हणून पोलिसावर हल्ला

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील लामकानी येथे मावशीच्या घरी 14 लाखांची चोरी झाली. मात्र अद्याप चोरटे सापडले नाही, म्हणून एकाने सोनगीर पोलिस (police) कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल टोच्याने वार करत जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात राहणारा राजेंद्र उत्तम मोरे याच्या लामकानी येथे राहणार्‍या मावशीकडे काही दिवसांपूर्वी 14 लाखांची चोरी झाली. या गुन्ह्याचा अद्याप तपास लागलेला नाही. म्हणून राजेंद्र मोरे याने दारूच्या नशेत बोरीस पोलीस बीट तेथे पोना. नरेंद्रसिंग गिरासे यांच्याशी हुज्जत घातली. मावशीच्या घरात 14 लाखांची चोरी झाली आहे, तुम्ही पोलीस काय करत आहे. तुम्हाला गुरांची गाडी सापडते, चोर का सापडत नाही, असे म्हटले. त्यानंतर टेबलावरील टोचा उचलून शिवीगाळ करीत पोना.गिरासे यांच्या उजव्या हातावर मारून त्यांना जखमी केले. तसेच, अशी धमकीही दिली. अशी फिर्याद पोना गिरासे यांनी दिली आहे. त्यानुसार राजेंद्र मोरे याच्यावर गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोसई.विजय चौरे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपतींच्या समाधीपेक्षा वाघ्या दंतकथेची उंची मोठी का?; संभाजीराजेंचा...

0
मुंबई । Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आल्याचं दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून...