रावेर । प्रतिनिधी raver
तालुक्याचा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्यविषयक सुविधा नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या पाहिजेत. रावेर येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून या रुग्णालयातून जनतेला अत्यावश्यक व तात्काळ आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी या रुग्णालयाचा दर्जा वाढवून उप जिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिली.
रावेर मतदार संघातील तामसवाडी, बोरखेडा, शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, कळमोदा, न्हावी या गावात मतदारांशी उमेदवार धनंजय चौधरी यांनी संवाद साधला. त्यावेळी आरोग्यविषयक विषयावर त्यांनी मत व्यक्त केले. प्रचार फेरीत कॉँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, गोटूशेठ महाजन, योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील, दीपक महाजन, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राजू सवर्णे, सोपान पाटील सावखेडा बु. येथील सरपंच युवराज कराड, लतिफ तडवी, अल्लाउद्दीन तडवी, गोपाल पाटील, रशीद तडवी, नवाब तडवी, योगेश सैतवाल, निलेश महाजन, अकबर मुल्लाजी, प्रफुल्ल महाजन, समाधान पाटील, हेमचंद्र महाजन, सोमा महाजन, भानू महाजन, केशव सैतवाल, अनवर तडवी, सावखेडा खुर्द येथील मिलिंद चौधरी, तुषार चौधरी, वैभव बखाल, रवींद्र बखाल, भिकारी तडवी, शरीफ तडवी, किरण महाजन, चेतन कोळी, किरण महाजन, सबदल तडवी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.
इम्रान प्रतापगढी यांची 12 रोजी सभा
– महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ देशातील प्रसिद्ध उर्दूहिन्दी कवी, सुप्रसिद्ध शायर तथा कॉँग्रेसचे नेते खा.इम्रान प्रतापगढी यांच्या जाहीर सभेचे आयोजन दि.12 मंगळवार रोजी फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजजवळ सकाळी 9 वाजता या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.