Tuesday, November 26, 2024
Homeधुळेशंभर रूपयांसाठी चाकू भोसकून पिता-पुत्राला जीवे मारण्याचा प्रयत्न

शंभर रूपयांसाठी चाकू भोसकून पिता-पुत्राला जीवे मारण्याचा प्रयत्न

धुळे । dhule। प्रतिनिधी

शहरातील कुमार नगरात दारू पिण्यासाठी (drink alcohol) शंभर रूपये दिले नाही म्हणून एकाने पिता-पुत्राच्या (father and son) पोटात चाकु (knife) भोसकून त्यांना जिवे मारण्याचा (Attempt to kill) प्रयत्न केला. काल रात्री ही घटना घडली. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सागर तारांचद तुलसाणी (वय 24) व ताराचंद तुलसाणी (रा. दुसेजा फॅक्टरीच्या पाठीमागे, कुमार नगर, साक्री रोड, धुळे) अशी जखमी पिता-पुत्राची नावे आहेत. काल दि. 23 रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान झुलेलाल मंदिराजवळील आसुदमल कसारामल किराणा दुकानासमोर बंटी होतचंद बजाज (वय 31 रा. कुमार नगर) याने दारू पिण्यासाठी शंभर रूपयांची मागणी केली.

ते दिले नाही म्हणून त्याने सागर यास शिवीगाळ करीत मारहाण केली. खिशातील चाकु काढून पोटात खुपसला. तेव्हा सागर यास वाचविण्यासाठी त्याचे वडील तारांचद तुलसाणी हे आले असता त्याने त्यांच्याही पोटात चाकु खुपसून दोघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली.

याबाबत सागर तुलसाणी याच्या जबाबावरून बंटी बजाजविरोधात भादंवि कलम 307, 326, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष तिगोटे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या