Monday, October 14, 2024
Homeजळगावअल्पवयीन मुलावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील गांधी मार्केट परिसरात शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपल्या भावाला शोधण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर चार ते पाच जणांनी दारूच्या नशेत पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा हे थरार नाट्य घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधत तक्रार देण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील भिलपूरा परिसरात राहणारा नवाज शेख अलाउद्दीन शेख (वय-17) हा दि.26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास लहान भावाला शोधण्यासाठी गांधी मार्केट परिसरात गेला. गांधी मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावर काही चार ते पाच जण दारू पित होते. त्यावेळी नवाज हा त्याठिकाणी भावाला शोधण्यासाठी आला असता पाचही जणांनी दारूच्या नशेत नवाजचा हात पकडला.

नवाजच्या खिश्यातील 15 रुपये हिसकावून घेऊन त्यास मारहाण करण्यास सुरूवात केली. यातून आपली सुटका होण्यासाठी नवाजने हात झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तीन दारूड्यांनी नवाजला पकडले आणि एकाने अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्यासाठी माचीस शोधत होता. त्यावेळी नवाजने हाताने जोरदार झटका दिल्याने आपली सुटका करत तेथून पळ काढला आणि घर गाठले. नवाजने घरच्यांना घडलेली आपबिती सांगितली. कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात चार ते पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गांधी मार्केट दारूड्याचा अड्डा

शहरातील गांधी मार्केटच्या तिसरा आणि चौथा मजला शनिवार आणि रविवारी दुकाने बंद राहतात. त्यामुळे मार्केट परिसरात शुकशुकाट असल्याने देशी दारू पिणार्‍यांसाठी गांधी मार्केटचे तिसरा व चौथा मजला दारुड्यांचा एकप्रकारे अड्डा बनला आहे. या मार्केटच्या गाळयाजवळ मोठ्याप्रमणावर दारूच्या बाटल्या आणि प्लॉस्टी ग्लास पडलेली दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या