Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमगौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

गौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे व माजी नगरसेविका कल्पना चुंबळे यांचे पुत्र व गौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखा नगर परिसरात अज्ञात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला चुंबळे यांच्या हल्ला होणार असल्याची घटना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळावरून निघून गेल्याने ते बाल बाल बचावले.

गुरुवारी दुपारच्या सुमारास लेखा नगर परिसरातील अंडा भुर्जी च्या गाड्यावर लेखानगर झोपडपट्टी येथील काही व्यक्ती गेले होते आम्हाला फुकट अंडा भुर्जी द्या असे धमकाऊ लागले व नकार देतात त्याला मारहाणही केली. यामुळे भुर्जी विक्रेत्याने मारहाण केल्याचा प्रकार अजिंक्य चुंबळे यांना सांगितला. यानंतर चुंबळे यांनी मारहाण केली असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे सांगितल्यानंतर मारहाण करणाऱ्या त्या संशयित व्यक्तींनी काही वेळानंतर लेखानगर परिसरात येत अजिंक्य चुंबळे यांना टार्गेट केले.

तू अंडा भुर्जी विक्रेत्याला पोलीस ठाण्यात आमच्या विरोधात तक्रार द्यायला लावतो का असे म्हणत आठ ते दहा जणांच्या टोळक्याने चुंबळे यांचा पाठलाग करत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र चुंबळे यांनी घटनास्थळावरून निघून बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये ते गेल्याने बाल बाल बचावले घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळतात तात्काळ पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...