Sunday, May 26, 2024
HomeनाशिकNashik Crime News : इंडियन बॅंकेत दरोड्याचा प्रयत्न; स्लॅब फोडून लॉकर रूममध्ये...

Nashik Crime News : इंडियन बॅंकेत दरोड्याचा प्रयत्न; स्लॅब फोडून लॉकर रूममध्ये केला प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad MIDC) इंडियन बँकेत (Indian Bank) रात्री अज्ञात चोरट्याने लोकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब मशीनच्या सहाय्याने फोडला. त्यानंतर आत मध्ये शिरून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

Irshalwadi Landslide : दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करणार; छगन भुजबळांची घोषणा

त्यामुळे बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती सकाळी समजतात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉडला पाचारण केले.

Irshalwadi Landslide : “मासेमारी करून घरी परतत होते अन् त्यांच्या डोळ्यासमोरच…”; इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितली भयावह आपबिती

याप्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील सदर घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्य करताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या