Thursday, May 15, 2025
Homeजळगावसावधान : सौदर्यप्रसाधने घेताय... तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच...

सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय… तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील दोन दुकानांमध्ये लॅक्मे आणि रॅटकिट (Lakme and Ratkit)या सौंदर्य प्रसाधन कंपनींचे नाव वापरून बनावट व हलक्या दर्जाचे (Fake and low quality) सौंदर्य प्रसाधनांची (Cosmetics)विक्री (sale)करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या नेत्रिका कन्सल्टींग ण्ड इन्वेस्टीगेशन कंपनीच्या पथकासह शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघड झाला आहे. या कारवाईत 2 लाख 58 हजार रूपयांचा माल पोलिसांना जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानमालक विपीन प्रताप वरमाणी (वय-33, रा. सिंधी कॉलनी) यांच्याविरूध्द कॉपीराईट क्ट 1957 चे कलम 51 व 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअपBeauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…

मुंबईच्या नेत्रिका कन्सटींग अ‍ॅण्ड इन्वेस्टीगेशन कंपनीमध्ये सिध्देश सुभाष शिर्के हे फिल्ड ऑफिसर म्हणून नोकरीस आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर व रॅटकिट कंपनीच्या नावाने कुणी बनावट सौंदर्य प्रसादने विक्री करीत असेल तर संबंधितावर कॉपीराईट अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार नेत्रिका कन्सटींग अ‍ॅण्ड इन्वेस्टीगेशन कंपनीला देण्यात आला आहे.

Makeup Part 4 # असा करा Self makeup

शहरातील एम.जी.रोडवरील साई प्लाझामधील शान एनएक्स आणि सेंट्रल फुले मार्केटमधील तळमजल्यातील शान जनरल स्टोअरमध्ये हिंदूस्तान युनिलिव्हर कंपनीचे सौंदर्य प्रसाधन प्रोडक्ट लॅक्मे व रॅटकिट कंपनीचे विट प्रोडक्टचे बनावट उत्पादने खरे असल्याचे भासवून त्याची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे फिल्ड ऑफिसर सिध्देश शिर्के यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जळगाव गाठून ही माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना दिली होती. त्यांनी देखील लागलीच शहर पोलिसांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअपभयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद

धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त

बुधवारी सकाळी सिध्देश शिर्के यांच्यासह त्यांचे सहकारी सचिन गोसावी व इतरांनी शहर पोलिस ठाण्यात येवून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांचे पथक तयार करुन ते शिर्के यांच्यासोबत गेले. हे पथक एम.जी. रस्त्यावरील शान एनएक्स दुकानात जावून त्यांनी धाड टाकली. दुकानाची झडती घेतल्यावर हिंदूस्तान युनिलिव्हर व रॅटकीत कंपनीचे नाव वापरलेले तब्ब्ल 2 लाख 8 हजार 981 रूपयांचा बनावट माल मिळून आला. हा माल पोलिसांना जप्त केला.

दोन तासानंतर दुसर्‍या दुकानात छापा

एम. जे. रोडवरील शान एनएक्समध्ये छापा मारून माल जप्त केल्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या पथकाने वरमाणी यांच्याच मालकीच्या फुले मार्केटमध्ये असलेल्या शान जनरल स्टोअरमध्ये छापा मारला. याठिकाणी सुध्दा हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे नाव वापरलेले 49 हजार 50 रूपयांचा बनावट सौंदर्य प्रसाधनांचा माल आढळून आला.

गुर्जर समाजाने केला हा आदर्श ठरावपत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेपआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?आयशरच्या घडकेत दुचाकीस्वार ठार

एकाच मालकाच्या दोन दुकानांमध्ये कारवाई

मुंबईच्या नेत्रिका कन्सटींग अ‍ॅण्ड इन्वेस्टीगेशन कंपनीच्या अधिकार्‍यांसह शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, विजय निकुंभ, किशोर निकुंभ, संगिता इंगळे, रतन गिते यांनी विपीन प्रताप वरमाणी (33, रा. सिंधी कॉलनी) यांच्या मालकीच्या दोन दुकानात केलेल्या कारवाईत 2 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संपुर्ण माल जप्त करून वरमाणी याच्याविरूध्द कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

कारवाईमुळे व्यापार्‍यांचे धाबे दणाणले

कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणार्‍यांवर कंपनीच्या अधिकार्‍यांनी धडक कारवाई केली. या कारवाईमुळे बनावट प्रसाधनांची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणून गेले आहे.

वृद्धाला भरधाव दुचाकीची धडक : गोलाणी मार्केटसमोरील घटना

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...