Wednesday, June 26, 2024
Homeनाशिकरक्षाबंधनासाठी आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

भाऊ-बहिणीचा अतूट नात्याचा सण रक्षाबंधन येत्या बुधवारी साजरा होणार आहे. यासाठी नाशिकच्या बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत. यामध्ये नवनवीन पद्धतीने बनविलेल्या राख्या व गोड खाद्य पदार्थांची दुकाने सजली आहे.

गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी महिलावर्गाचा राखी खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जसजसा रक्षाबंधन जवळ येत आहे तस राखी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे, असे राखी व्यावसायिकांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लुम्बा राखी, 20 ते 400 रुपये, भैय्या-भाभी राखी 40 ते 600 रुपये, पेर राखी 30 ते 400 रुपयांपर्यंत व चांदीच्या राख्या 40 ते 350 रुपयांपर्यंत स्टोन, डायमंड, लहान मुलांच्या राख्या कार्टून, मोटू-पतलू, लायटिंगची राखी अशा लहान मुलांना आकर्षित करणार्‍या राख्या व तसेच देवराखी.

घरी बनवलेल्या राख्यांना प्रतिसाद

हाताने बनवलेल्या राखीला बाजारपेठेत अधिक महत्व आहे. घरघुती बनवलेल्या राख्या खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे. घरगुती राख्या बनविण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जातात. त्या अनुषंगाने कलाकुशलतेचा वापर करून हाताने बनविलेल्या आकर्षित राख्यांना देखील अधिक महत्व आहे. या राख्यांची किंमत 40 रुपयापांसून ते 100 रुपयांपर्यंत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या