Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रबेडेकर मसाल्याचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन; वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला...

बेडेकर मसाल्याचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन; वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | Mumbai

- Advertisement -

बेडेकर मसाल्याचे (Bedekar Masale) संचालक अतुल वसंत बेडेकर (Atul Vasant Bedekar Passes Away) यांचे ५६ व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. अतुल बेडेकर यांच्यावर आज दुपारी दक्षिण मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे.

श्री. व्ही. पी. बेडेकर यांनी रत्नागिरीतील घर सोडले आणि १९१० मध्ये मुंबईला आले. बेडेकर हा लोणचे आणि मसाल्यांचा ब्रँड आहे जो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. सुरुवातीला त्यांनी किराणा दुकान टाकले. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असे कंपनीचे नामकरण केले.

Maratha Reservation: २ जानेवारी की २४ डिसेंबर? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

एकेकाळी पारंपारिक घरगुती गोड म्हणून ओळखला जाणारा मोदक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बेडेकर’ या अभिमानास्पद ब्रँड नावाने ओळखला जातो. दर्जेदार उत्पादने, ग्राहकांच्या अभिरुचीची समज, अपेक्षेनुसार बदल आणि काळाच्या सुसंगतपणे व्यवसाय वाढवण्याचे अनुभवी कौशल्य यामुळे बेडेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बेडेकर यांनी केवळ व्यवसाय आणि उद्योग चालवले नाहीत तर चार पिढ्यांपासून समाज आणि ग्राहकांशी घनिष्ठ नाते निर्माण केले आहे.

१९६० साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचे निर्यात होऊ लागले. कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास ६०० टन लोणचे सीझनला बनते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.

दिल्लीत प्रदूषणाचा कहर! अनेक भागात AQI ४०० पार, आजपासून शाळा बंद

बेडेकर कुटुंब एक यशस्वी उद्योगपती आणि व्यावसायिक असण्यासोबतच सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. बेडेकर यांनी सांस्कृतिक विस्तारासाठी ‘व्यासपीठ ज्ञान-मनोरंजन’च्या माध्यमातून ‘मार्गशीर्ष महोत्सव’ आणि ‘वसंत महोत्सव’ आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.

शंभर वर्षांची विश्वासार्ह परंपरा लाभलेल्या बेडेकर कुटुंबाने एक आदर्श उद्योगपती, कार्यक्षम व्यापारी, जबाबदार समाजसेवक तसेच राष्ट्रीय विचारधारेचे पालनपोषण करणारे म्हणून समाजात आणि व्यावसायिक जगतात उच्च स्थान प्राप्त केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या