Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजन'मन झालं मल्हारी' गाण्याची प्रेक्षकांना भुरळ

‘मन झालं मल्हारी’ गाण्याची प्रेक्षकांना भुरळ

मुंबई | Mumbai

आजकाल बॉक्स ऑफिसवर बरेच चित्रपट गाण्यांमुळे (Song) हिट होतात. यातील बरीच गाणी ही रोमँटिक असतात. त्यामुळे सध्या सिनेविश्वात रोमँटिक गाण्यांची क्रेझ जास्त असल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता ‘टीडीएम’ (TDM) या चित्रपटातील एका गाण्याने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

‘टीडीएम’ या चित्रपटातील ‘मन झालं मल्हारी’ या गाण्याने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय असला तरी प्रेयसी आणि प्रियकराची प्रेमाची व्याख्या ही इतर नात्यातील प्रेमापेक्षा काहीशी निराळीच असते, याच हुबेहूब वर्णन या गाण्यातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे या गाण्यातून नायक-नायिकेचा रोमँटिक अंदाज पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यदची पोलिसांत धाव; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं आज ट्रेंडिंगमध्ये असल्याचा दावा चित्रपट निर्मात्यांचा आहे. त्यानंतर आता ‘मन झालं मल्हारी’ हे गाणं प्रेक्षकांच्या (Audience) भेटीला आले असून रसिकांच्या मनावर राज्य करत असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊराव कऱ्हाडे यांनी केले असून २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) प्रदर्शित होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये उफाळणार नवा वाद;...

0
नाशिक | Nashik येथे २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela) होणार असून या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. परंतु, त्याआधीच साधू-संतांमध्ये नामकरण आणि...