औरंगाबाद – Aurangabad
आज सुभाष देसाई (Subhash Desai) हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Guardian Minister Subhash Desai) यांनी ‘हीच ती योग्य वेळ’ असल्याचे सांगत ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) असे नामांतर लवकरच करणार असल्याचे काही दिवसांपुर्वी सांगितले होते. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम सुभाष देसाई यांच्या अधिकृत लेटरहेडवरून जाहीर करण्यात आला आहे. एकंदरित आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) आधी शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून (Shivsena) सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते.
विशेष कार्य अधिकारी नितीन शिंदे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याचा उल्लेखच पालकमंत्र्यांचा मुंबई-संभाजीनगर दौरा (Mumbai-Sambhajinagar tour) असा करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. 3 सप्टेंबर 2021
▪️10:55 वा. इंडिगो विमानाने संभाजीनगरकडे आगमन
▪️ दुपारी. 12.00 वा. संभाजीनगर येथे विमानाने आगमन.
▪️ दुपारी. 12.15 वा.जिल्ह्यातील व शहरातील विकास प्रकल्पासंबधी 09 सप्टेंबर,2021 रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे करावयाच्या सादरीकरणाचा आढावा ( जिल्हाधिकारी व मनापा आयुक्त) स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय.
▪️ दुपारी. 2 ते 3 वा. राखीव.
▪️ दुपारी 3.00 वा. मोटारीने नेवासाकडे प्रयाण.