Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये गोवरचा विळखा वाढला ; नवे ११ रुग्ण आढळले

औरंगाबादमध्ये गोवरचा विळखा वाढला ; नवे ११ रुग्ण आढळले

औरंगाबाद – aurangabad

शहरात दिवसेंदिवस गोवर (Measles) साथीचा उद्रेक वाढतच चालला आहे. चिकलठाणा, नेहरू नगर, विजयनगर, बायजीपुरा, भवानीनगर या पाच भागांत गोवरच्या संशयित बालकांचा उद्रेक झाला असून, आतापर्यंत ११४ बालके आढळून आली आहेत. गोवर साथीची आणखी ११ संशयित बालके निघाल्यामुळे हा आकडा १२५ वर पोहचल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने गांभीर्याने घेत लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्याचे ठरवले आहे. 

- Advertisement -

शहरात गोवर साथीची बालके मोठ्या संख्येने आढळून येत असल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक भागाच्या घराघरांत जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. १५ दिवसांत गोवर बालकांची संख्या शंभरच्या वर पोहचली आहे. आतापर्यंत १७ बालके पॉझिटिव्ह निघाली असून दररोज संशयित बालके आढळून येत आहेत. संशयित बालकांची संख्या १२५ वर पोहचली आहे. त्यात आढळून आलेल्या ११ बालकांचा समावेश आहे. यामध्ये नेहरू नगर भागात ३, नारेगाव भागात ४ आणि सातारा, जवाहर कॉलनी, मिसारवाडी, हर्सूल भागांत प्रत्येकी १ याप्रमाणे १९ संशयित बालकांचा समावेश आहे. तसेच ११ ठिकाणी अतिरिक्‍त लसीकरण सत्र राबविण्यात आले असून ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १५२ बालकांना अतिरिक्‍त लसीचा डोस देण्यात आला.

 
एमआर-१ च्या ४२ आणि एमआर-२ च्या ३३ बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. संध्या नलगीरकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. प्रेमलता कराड, डॉ. लीला सोनी, डॉ. मेघा जोगदंड व डॉ. बाळकृष्ण राठोडकर आदींनी सर्वेक्षण केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या