मेलबर्न । Melbourne
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची बाॅडर्र- गावस्कर मालिका खेळवली जात आहे. पाच सामन्यांची मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २-१ ने आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाच्या कमजोर फलंदाजीने या सामन्यात संघाला पराभव मिळवून दिला आहे. एका क्षणाला भारतीय संघ हा कसोटी सामनाही ड्रॉ करेल अशी आशा होती, पण भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी फेरलं आहे.
अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य होते. भारताला सुरुवातीचे धक्के बसले आणि धावसंख्या ३ गडी बाद ३३ अशी झाली, पण ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी झुंज देत सामन्याला जीवदान दिले. मात्र, शेवटच्या सत्रात दोन मोठे निर्णय भारताच्या विरोधात गेले आणि त्यांचा दुसरा डाव १५५ धावांवर आटोपला.
अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी १८४ धावांनी जिंकली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्यांच्याकडे २-१ अशी आघाडी आहे आणि ते ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी पात्र होण्याच्या जवळ आहेत.