मुंबई । Mumbai
पिंक-बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने आपला वरचष्मा कायम ठेवला आणि भारतावर 8 विकेटने मात करत सलग आठवा पिंक-बॉल विजय मिळवला.
जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्याने भारतीय संघाला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात निच्चांकी 36 धावसंख्येवर रोखलं, ज्यामुळे संघाला आपली आघाडी वाढवता आली नाही आणि विजयासाठी फक्त 90 धावांचे लक्ष्य मिळाले जे यजमान संघाने 2 विकेट न गमावता गाठले.
यासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 244 धावा करणाऱ्या भारताने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर संपुष्टात आणला आणि 53 धावांची आघाडी घेतली, मात्र तिसऱ्या दिवशी भारताचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला.
ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्स आणि स्टिव्ह स्मिथ नाबाद परतले. वेडने 33 धावा तर बर्न्सने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. कमिन्स आणि हेझलवूड संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हेझलवूडने 5 तर कमिन्सने 4 विकेट घेतल्या.