Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाAustralia vs India : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

Australia vs India : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली –

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उद्यापासून (17 डिसेंबर) सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात

- Advertisement -

आली आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे.

सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. फॉर्मात असणार्‍या गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. तर हनुमा विहारीच्या रुपानं एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमराह, शामी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान मार्‍याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ –

मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह

यांच्यावर राहणार नजर

भारत : मागील यशात चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण कामगिरी आणि भारताचा वेगवान मारा हे घटक महत्त्वाचे ठरले होते. आगामी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारताच्या फलंदाजीची मदार पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कोहलीवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवेल. त्यामुळे भारताच्या वेगवान मार्‍याची भिस्त जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर आहे.

ऑस्ट्रेलिया : वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध आहे. त्यामुळे धावांसाठी झगडणार्‍या जो बर्न्ससह सलामीची चिंता ऑस्ट्रेलियाला सतावते आहे, पण आता ऑस्ट्रेलियाकडे चिवट फलंदाजी करणारा मार्नस लबूशेन हा तारणहार आहे. फक्त 14 कसोटी सामन्यांत त्याने 63.43च्या सरासरीने 1459 धावा केल्या आहेत. पॅट कमिन्स आणि नॅथन लिऑन घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या