Saturday, May 17, 2025
Homeक्रीडाAUS vs SA T20 WC Final : आज वर्ल्डकप फायनल, दक्षिण आफ्रिकेच्या...

AUS vs SA T20 WC Final : आज वर्ल्डकप फायनल, दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नात ऑस्ट्रेलियाचा अडथळा

दिल्ली | Delhi

- Advertisement -

महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून आज फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये (Australia vs South Africa) ही फायनल खेळवली जाणार आहे.

भारताला मात देणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडला नमवून फायनल गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. महिला क्रिकेटमधील सर्वात बलाढय़ मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमवायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सर्वच आघाडय़ांवर सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ऑस्ट्रेलियाने सलग सात वेळा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाच वेळा ते विश्वविजेते आहेत.

ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलिया-आफ्रिका फायनल संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल, हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी टप्प्यातील दोन सामने गमावून फायनलपर्यंत पोहोचला आहे.

दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका :

सुने लुउस (कर्णधार), अॅनेरी डर्कसेन, मारिजन कॅप, लारा गुडॉल, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, शबनीम इस्माईल, तझमिन ब्रिट्स, मसाबता क्लास, लॉरा वोल्वार्ड, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, डेल्मी बोस्च, अॅनी. टकर.

ऑस्ट्रेलिया :

मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी’आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : दोन लाखासाठी विवाहितेची हत्या

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi नेवासा (Newasa) तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून (Married Woman Murder) झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी...