Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजठाकरे महाराष्ट्राबाहेरून आले; मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का?...

ठाकरे महाराष्ट्राबाहेरून आले; मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? स्वामी अविमुक्तेश्वरांनंद सरस्वती

मुंबई | Mumbai
मराठी भाषेवर कोणाचे प्रेम असेल, तर त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मराठीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कोणी कटिबद्ध होत असेल, तर यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, मराठी भाषेसाठी कुणी कानशि‍लात लगावायला लागले, तर त्या भाषेचे यश वाढेल का? केवळ महाराष्ट्रात राहणारे लोकच मराठीवर प्रेम करतात, असे आपल्याला वाटते का, संपूर्ण देश मराठीवर प्रेम करतो, असे प्रतिपादन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. चातुर्मासाची सुरुवात झाली असून, शंकराचार्य मुंबईत आहेत.

मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का?
मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा-पणजोबांनी जे लिहून ठेवलेय त्यात हे म्हटले आहे की आम्ही मगधहून आलो होतो. मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारले. त्यांना इतके मोठे केले की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? राज ठाकरे जे म्हणाले आहेत की मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत ठेवून द्या पण व्हिडीओ काढून नका. एक माणूस खुलेआम गुन्हा करायला सांगतो आणि पुरावे ठेवू नका म्हणतो आहे. याची दखल सरकारने घेतली पाहिजे असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या पूर्वजांना प्रेम दिले. ते आपण पुढे का नेत नाहीत. लोकांना एवढे प्रेम द्या की, ते त्यांची भाषा विसरून मराठी स्वीकारतील. हा मार्ग तुम्ही का स्वीकारत नाही, असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.

YouTube video player

देशात एकच भाषा येणाऱ्यांची संख्या जास्त
मराठी भाषिक लोक देशभरात जाऊन कार्य करत आहेत. देशाबाहेरही अनेक ठिकाणी मराठी शिकवली जाते. प्रत्येकाला एकापेक्षा जास्त भाषा येतीलच असे नाही. प्रत्येक जण बहुभाषिक असेल असे नाही. देशात केवळ एकच भाषा येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांना मराठी आली पाहिजे किंवा सगळ्यांनी मराठी शिकली पाहिजे, असा आग्रह तुम्ही कसा काय धरू शकता, अशी विचारणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.

“ठाकरेंबाबत मी काही व्यक्तिगत भाष्य करणार नाही. मात्र या दोघांची युती यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण राज ठाकरे यांचे राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. तसेच त्यांचे जे सहकारी सध्या आहेत त्यांचीही धोरणे वेगळी आहेत. त्यामुळे हे दोन बंधू एकसाथ जास्त काळ चालू शकणार नाहीत. कारण राज ठाकरे एका समाजाला घेऊन चालतात. उद्धव ठाकरे आता सर्वसमावेशक विचारांचे झाले आहेत. हिंदीला विरोध, मराठीचा आग्रह हा त्यांचा विषयच नाही. या सगळ्यातून ते राजकारणच करत आहेत आणि ते सगळ्यांना समजतेय.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...