दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेस जलशक्ती मंत्रालयाचा केंद्रस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून यामुळे दिंडोरी तालुक्याच्या नावलौकिकमध्ये भर पडला आहे.
जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कान्ताराव यांनी निळवंडी येथील जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेस पत्र दिले असून या पत्रात संस्थेचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्यालाही पाणी वापराबाबत पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. निळवंडी येथील जय कानिफनाथ पाणी वापराचा दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुनील कृष्णाजी पाटील यांनी दिली.
जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेच्या उपक्रमांसाठी चेअरमन सुनिल पाटील, व्हा. चेअरमन मधुकर पवार, सचिव सोमनाथ पताडे, संचालक शाम पाटील, कचरू पवार, आण्णा पाटील, परशराम पाटील, इंदुबाई पाटील, म्हाळसाबाई पाटील, चंद्रभागाबाई पताडे, पाटकर पुंडलिक चारोस्कर यांनी परिश्रम घेत आहेत.
संस्थेच्या यशाबद्दल कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, स.पं. केंद्र ओझरचे वाघावकर, वाघाड प्रकल्पाचे संंस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भागवत, दिंडोरीचे उपविभागीय अभियंता अभियंता वन्नेरे, दिंडोरी विभागाचे अभियंता भंडारी, वाघाडचे अभियंता जैसल चौरासिया, दिंडोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास पाटील, माजी उपसरपंच भाऊसाहेब पाटील, पोलिस पाटील अंबादास पाटील, पाणी वापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास पाटील, सुनिल लोखंडे, कचरू पाटील, सरपंच मनिषा चारोस्कर, उपसरपंच शंकर पाटील, गणेश हिरे, मनोज पाटील आदींसह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.




