Saturday, June 14, 2025
Homeनाशिकमोडाळेच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा; 'हा' पुरस्कार जाहीर

मोडाळेच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा; ‘हा’ पुरस्कार जाहीर

बेलगाव कुऱ्हे | Belgaon Kurhe

- Advertisement -

विकासाचे पर्व, सामाजिक एकता, सुंदर गाव, सुंदर विचारांची माणसे आणि सुंदर इमारती अशी विविधांगी वैशिष्ट्य असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) मोडाळे (Modale) गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार आहे…

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत (Zilla Parishad) आर. आर. ( आबा ) पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार मोडाळे गावाला घोषित झाला आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) नाशिक येथे होणाऱ्या सोहळ्यात पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्या हस्ते गावाला पुरस्कार दिला जाणार आहे.

यापूर्वी गावाने केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारचे (State Govenment) अनेक मानाचे पुरस्कार पटकावलेले आहेत. मोडाळे गावकरी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयामुळे हे शक्य झाले आहे, असे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके (Gorakh Bodke) यांनी सांगितले.

फिटनेस प्रशिक्षिका आचार्य यांना ‘राष्ट्रीय रत्न पुरस्कार’

सरपंच मंगला बोंबले, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर हे गावासाठी दिला जाणारा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारणार आहेत. गावकऱ्यांनी पुरस्काराची माहिती मिळताच आनंदोत्सव साजरा केला आहे.

राष्ट्रध्वज फडकवण्याचे काय आहेत नियम?; जाणून घ्या सविस्तर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि...