Wednesday, April 2, 2025
HomeमनोरंजनAyushmann Khurrana : आयुष्मान खुरानाला पितृशोक, हृदयविकाराने पी खुराना यांचे निधन

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाला पितृशोक, हृदयविकाराने पी खुराना यांचे निधन

मुंबई | Mumbai

बॉलीवूड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील, प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे निधन झाले आहे.

- Advertisement -

आज १९ मे रोजी त्यांनी चंदीगढ येथील घरात अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुषमानचे वडील गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. मोहालीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आयुषमान खुरानाचे वडिलांसोबत खूप घट्ट नाते होते. आपल्या करिअरचे पूर्ण श्रेय तो सतत वडिलांना देत असे. एका इंटरव्ह्यूमध्ये आयुषमानने म्हटले होते की वडिलांनी मुंबईत जाऊन एका व्यक्तीला माझा मुलगा एक दिवस मोठा अभिनेता होणार असे म्हटल्याचे सांगितले होते.

याविषयी आयुषमानला काही माहिती नव्हती. पण जेव्हा आयुषमानला कळाले तेव्हा त्याने जिद्दीने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ म्हणजे काय? विधेयकात नेमकं काय आहे?...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांनी लोकसभेत...