Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : आज येवल्यात 'आजादी गौरव पदयात्रा'

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : आज येवल्यात ‘आजादी गौरव पदयात्रा’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने (Nashik District Congress Committee) ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी येवला (Yeola) येथील तात्या टोपे (हुत्माता) स्मारक येथून सकाळी १०:३० वाजता होणार आहे…

- Advertisement -

पेठ (Peth), मनमाड (Manmad) शहरातही ही पदयात्रा जाणार आहे. यावेळी तालुक्यातील स्वांतंत्र्य सेनानी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस जनाचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, गीत, पोस्टर, बॅनर आदींचा समावेश करत या पदयात्रेची सुरुवात केली जाईल. बुधवारी (दि.१०) सिन्नर, शुक्रवारी (दि. १२) कळवण, नांदगाव, मालेगाव, शनिवारी (दि.१३) बागलाण, निफाड, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, रविवारी (दि.१४) चांदवड, देवळा, इगतपुरी आदी तालुक्यात पदयात्रा काढली जाणार आहे.

या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार हिरामण खोसकर, माजी आ.अनिल आहेर, शिरिषकुमार कोतवाल, काशिनाथ बहिरम, रमेश कहांडोळे, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, सुमित्रा बहिरम, संपत सकाळे, दिंगबर गिते, निर्मला खर्डे, भास्कर गुंजाळ, यशवंत पाटील, संदीप गुळवे, गुणवंत होळकर, ज्ञानेश्वर काळे, मानस पगार, स्वप्निल पाटील, गोपाळ लहामगे, शैलेश पवार, संपत वक्ते, अब्दुल कोकणी, अल्तमेश शेख, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब कासार, रतन जाधव, भरत टाकेकर, कचरू शिंदे, प्रकाश पिंगळ, यशवंत अहिरे, भिमराव जेजुरे तसेच सर्व फ्रटंल विभाग, मिडिया सेल प्रमुख आदींसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या