Saturday, May 4, 2024
Homeनाशिकबाळ येशू यात्रेला सुरुवात; लाखो भाविकांची हजेरी

बाळ येशू यात्रेला सुरुवात; लाखो भाविकांची हजेरी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर ( Nashik-Pune highway) असलेल्या नेहरूनगर येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानात बाळ येशू यात्रेला (Baal Jesus Yatra) आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा दोन दिवस सुरू राहणार असून या यात्रेसाठी देशभरातून ख्रिस्ती भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत…

- Advertisement -

दरवर्षी बाल येशू यात्रा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी भरते. यावर्षी सुद्धा आज (दि.११) रोजी यात्रेला सुरुवात झाली. करोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षापासून निर्बंध असल्याने सदरची यात्रा मर्यादित भाविकांच्या (Devotees) उपस्थितीत सुरू होते. परंतु, यावर्षी सर्व निर्बंध हटल्याने पूर्वीप्रमाणेच बाळ येशू यात्रेला आज सकाळी प्रारंभ झाला. यात्रेसाठी मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, वसई, चेन्नई, गोवा या मोठ्या शहरातून भाविक मोठ्या प्रमाणात हजर झाले. त्याचप्रमाणे काही भाविक मुंबईहून रेल्वेने तर अनेक भाविक आपल्या खाजगी वाहनाद्वारे यात्रेसाठी येत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

IND VS AUS 1st Test : भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘इतक्या’ धावांनी विजय

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर ते बिटको चौक ( Uunagar to Bitco Chowk) दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. परंतु, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे निलेश माईनकर शहर वाहतूक शाखेच्या नाशिकरोड विभागाचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतुक सुरळीत सुरु होती.

धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

त्याचप्रमाणे सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानाबाहेर व आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पार्किंग लागली होती. त्यामुळे काही वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग केली जात होती. तसेच यात्रेनिमित्त बाल येशु मंदिराच्या बाहेर विविध प्रकारच्या दुकानांसह खाद्यपदार्थाची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटलेली होती. तर खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हेल्मेट घालत असाल तर सावधान! आधी ‘हा’ Video एकदा पाहाच

तसेच बाळ येशु मंदिराच्या (Temple) आवारात पिलग्रीम व रिट्रीट हाऊस व सभागृहात भाविकांची सोय करण्यात आली होती.शाळेच्या मैदानात मिसासाठी भव्यमंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी दर तासाला प्रार्थना केली जात होती. तर फादर अगस्ती न डिमेलो फादर एअरोल फर्नांडिस फादर टोनी फादर लोगो व सहकारी दोन महिन्यापासून यात्रेची तयारी करत होते.

Valentine Day : …आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

- Advertisment -

ताज्या बातम्या