मुंबई | प्रतिनिधी Mumbai
काल शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात गोळीबार झाला यात त्यांचा मृत्यू झाला. तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात त्यांचा मूत्यू झाला. बाबा सिद्दीकी हे माजी राज्यमंत्री तसेच म्हाडाचे अध्यक्ष राहिले होते .
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वांद्र्यासह संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात आली. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी झाली. त्या नंतर मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दींकींच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला. या वेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार तसेच राजकीय क्षेत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ अनेक नेते, उपस्थित होते.