Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : ठाकरे गटाला धक्का; बबनराव घोलप यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा

Nashik News : ठाकरे गटाला धक्का; बबनराव घोलप यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उपनेते म्हणून ओळख असलेले बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आपल्या उपनेतेपदाचा तसेच शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठविला आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे घोलप यांनी शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा (Shirdi Lok Sabha Liaison Chief) दिल्याचे समजते असून त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, बबनराव घोलप शिवसेनेचे हे ज्येष्ठ नेते असून १९९५ मध्ये शिवसेना व भाजप युतीची सत्ता आली तेव्हा ते कॅबिनेट व जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) होते. २५ वर्ष ते देवळाली मतदारसंघाचे आमदार (MLA) होते, तर पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप (Yogesh Gholap) हे आमदार होते. शिर्डी लोकसभा मतदार संघात त्यांचा दांडगा संपर्क होता. तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना उमेदवारी स्वीकारता आली नाही.

मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

त्यानंतर येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून बबनराव घोलप यांना उमेदवारी देण्यात येणार होती. त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती, अनेकवेळा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांसमवेत दौरा करून प्रचारही सुरू केला होता. तसेच ते शिर्डी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सुद्धा होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असतानाच घोलप यांना विश्वासात न घेता शिर्डी लोकसभा मतदार संपर्कप्रमुखपदी माजी आमदार सुनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याने बबनराव घोलप व त्यांचे सहकारी नाराज झाले.

त्यातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchore) यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मातोश्री येथे जाऊन पक्षप्रवेश केल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. या सर्वच निर्णयामुळे बबनराव घोलप व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. परिणामी बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा (Deputy Leader) व शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघात व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी काम करत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपण सातत्याने दौरा करत होतो. मात्र, अचानक मला विश्वासात न घेता तिथे संपर्कप्रमुख म्हणून माजी आमदार विलास शिंदे यांची नेमणूक केली. त्यामुळे आपण नाराज झालो व आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला.

बबनराव घोलप, नेते शिवसेना ठाकरे गट

- Advertisment -

ताज्या बातम्या