Monday, January 26, 2026
HomeनाशिकNashik News: "मला सस्पेंड केलं तरी चालेल,पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही";...

Nashik News: “मला सस्पेंड केलं तरी चालेल,पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही”; महिला पोलिसाचा गिरीश महाजनांसमोर संताप

नाशिक | Nashik
देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नाशिकमधील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र,येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपल्या भाषणात त्यांनी घेतले नसल्याचे सांगत वन विभागाच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

नेमकी घटना काय घडली?
पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला आहे.पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिला पोलिसानं घेतला होता. या कार्यक्रमात जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचं नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे.त्यांनी महाजनांना जाब विचारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले,

- Advertisement -

माधवी जाधव काय म्हणाल्या?
मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत, कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता संविधानामुळे आहे. पण, जे लोकं संविधानाला कारणीभूत नाहीत, लोकशाहीला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली. मात्र, जे संविधानाला कारणीभूत आहेत, प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव का घेतलं जात नाही, असे म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र भावना व्यक्त केल्या.

YouTube video player

पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी
याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत.”

पण बाबासाहेंबांच नाव भाषणात आलं नाही
“बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही,” असा सवालही त्यांनी विचारला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील साई भक्तांकडून साईचरणी एक कोटीचा सुवर्ण मुकुट अर्पण

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi श्री साईबाबांवर (Sai Baba) देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान (Donate) अर्पण करत असतात. रविवारी अमेरिका...