Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : बेबी केअर किटसाठी 26 कोटींचा निधी

Ahilyanagar : बेबी केअर किटसाठी 26 कोटींचा निधी

सरकारी रुग्णालयात प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilynagar

नवजात शिशूंसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बेबी केअर किटचे वाटप करण्यात येते. सन 2025-26 या वर्षात तब्बल 26 कोटी 1 7 लाख रुपयांचे बेबी केअर किट खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नवजात शिशूंच्या देखभालीसाठी मातांना बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती झालेल्या नवजात बालकांच्या मातांना शासनातर्फे दोन हजार रुपयांपर्यंत ‘बेबी केअर किट’ सन 2019 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व प्रसूत झाल्यानंतर 2 महिन्यांच्या आत अर्ज सादर करणार्‍या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर किटचे वाटप करण्यात येते. महिलांची प्रसूती अधिकाधिक प्रमाणात सरकारी रुग्णालयात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून सरकारने ही योजना सुरू केली आहे.

YouTube video player

या योजनेमध्ये नवजात मुलाला आईचे दूध व योग्य पोषण मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सन 2025-26 या वर्षात तब्बल 26 कोटी 1 7 लाख रुपयांचे 1 लाख 31 हजार 16 इतके बेबी केअर किट खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बेबी केअर किटमधील साहित्य
मुलाचे कपडे, छोटी गादी, टॉवेल, प्लास्टिक डायपर, मालिश तेल, थर्मामीटर, मच्छरदाणी, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट, शॅम्पू, नेलकटर, हातमोजे, पायमोजे, बॉडी वॉश लिक्विड, हँड सॅनिटायझर, आईसाठी गरम कपडे व छोटी खेळणी या साहित्यांचा बेबी केअर किटमध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्या

पियुष

Piyush Goyal: “दोन्ही पक्षांचे हित जपले गेले आहे, या व्यापार करारामुळे…”,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापार करारावरून आज लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. या करारामुळे भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांना...